चांडक विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
कोरोनाने देशभर थैमान घातल्याने पाठ्मागील दोन वर्ष दहीहंडीचा उत्सवावर असणारे कोरोनाचे सावट पाहता उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र आता कोरोनावर मात करत सर्व सुरळीत झाल्याने प्रशासनाने सर्व निर्बंध हटवले असून, यावर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात दहीहंडीचा उत्सव देशभर साजरा करण्यात आला.मलकापूर स्थानिक लि. भो.चांडक विद्यालय व महाविद्यालयात गोपाळकाला निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात बाळ श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून करण्यात आली. यावेळी प्राचार्य जयंतराव राजुरकर, उपप्राचार्य वैद्य सर व पर्यवेक्षक राजपूत सर व पर्यवेक्षिका सौ. काळबांडे मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थी- विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवून ३ ते ४ थर तयार करून दहीहंडी फोडण्याचा कनिष्ठ आनंद घेतला. यावेळी हाथी घोडा पालखी जय हो कन्हैया लाल की' च्या जयघोषात शाळेचा परीसर दुमदुमून गेला होता.कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, अन्य कर्मचारी आणि शारीरिक शिक्षक जी. टी. तायडे, विक्रांत नवले, तोमर सर, काळे सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना गोपाळकाला प्रसादाचे विरतरण करून कार्यक्रमाची सांगता पसायदान म्हणून करण्यात आली.