Breaking News
recent

शिवसेना नवीन कार्यकारणी खा. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थिती जाहीर


श्रीकांत हिवाळे नांदुरा/प्रतिनिधी

   मुख्यमंत्री यांच्या आदेशाने खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हा (घाटाखाली)  शिवसेनेचे नांदुरा तालुका प्रमुख संतोष भाऊ डिवरे यांची बुलढाणा जिल्हा उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.तर नांदुरा तालुका अध्यक्षपदी सिद्धेश्वर तांदूळवाडी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील पाटील त्यांची नियुक्ती करण्यात आली. 



   त्यानंतर मलकापूर विधानसभा मतदारसंघ जिल्हा उपप्रमुख पदी युवा सेना शेंबा येथील सरपंच ॲड. नंदकिशोर खोंदले यांची निवड युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.तर मलकापूर तालुका प्रमुख पदी विजय साठे, नांदुरा उपतालुका प्रमुखपदी शिवसेनेचे संतोष लाहुडकर, नांदुरा शिवसेना शहर प्रमुख म्हणून अनिल जांगळे, नांदुरा शहर युवा सेना प्रमुख पदी राज सुसरे यांची निवड करण्यात आली. सदर नवनियुक्त कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे युवा कार्यकर्त्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे.

Powered by Blogger.