Breaking News
recent

स्वाभिमानी आगामी जि.प.प.स.निवडणुक स्वबळावर लढणार!प्रशांत डिक्कर



संग्रामपुर प्रतिनिधी

स्वाभीमानी शेतकरी संघटना ही शेती व शेतकऱ्यांसाठी झगडते राजकारण ही बाब संघटना व आमच्या कार्यकर्त्यांसाठी दुय्यम स्थानावर आहे‌‌. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आम्ही शासन-प्रशासनाशी दोन हात करतो असे करत असतांना अशा समस्या आणखी गतीने सोडवुन घेण्यासाठी सत्तेत सहभागी होणे ही काळाची गरज आहे. म्हणून आगामी जि. प. प.स.ची निवडणुक स्वाभीमानी शेतकरी संघटना जळगाव जा विधानसभा ‌मतदार संघातिल सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन स्वाभीमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी वरवट बकाल येथे पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीत बोलतांना केले. काल १३ ऑगस्ट रोजी तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात स्वाभीमानीची कार्यकर्ता बैठक पार पडली. निवडणूक विषयक कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्याकरीता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

  संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील जि. प. प. स. निवडणूक स्वबळावर लढा अशा प्रतिक्रिया सर्व कार्यकत्यांनी यावेळी कक्त केल्या. पुढे बोलतांना प्रशांत डिक्कर म्हणाले की आपण निवडनुकीत उतराव अशाच भावना अनेक गावातील गावकरी व्यक्त करीत आहेत. आपण निवडणूकीत विजयी झालो तर शेतकऱ्यांच्या समस्या आनखी वेगाने दुर करु निवडणूक केव्हाही जाहिर होऊ शकते आपण तयारीत असावे आपण आजपर्यंत केलेल्या कार्याचे फळ मतदार आपल्याला नक्कीच देतिल असा आत्मविश्वास डिक्कर यांनी बोलतांना व्यक्त केला.यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अंनता मानकर,अरुण देऊळकार, स्वाभिमानीचे नेते उज्वल चोपडे,गोपाल तायडे,विजय ठाकरे,उज्वल पाटील,प्रतिक गांवडे यांच्या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Powered by Blogger.