मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास चवरे व परिवाराकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
राष्ट्रध्वजाला प्रेरणा व प्राण मानून हा राष्ट्रध्वज स्वतःचे प्रतिष्ठान सहित नसवाला चौकातील श्री दिगंबर जैन मंदिरावर आवर्जून फडकविला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते सुहास चवरे यांच्या पुढाकारातून असे तिरंगा प्रेम गत पंधरा वर्षापासून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी नियमितपणे प्रफुल्लित केल्या जात आहे. दरम्यान ध्वजारोहण दिनी नियमांचे उल्लंघन होणार नाही याचीही खबरदारी सुद्धा त्यांच्याकडून गांभीर्याने घेण्यात येते.
तिरंग्या प्रति प्रेम व निष्ठा ठेवून मोठ्या जिव्हाळ्याने सुहास चवरे यांच्याकडून सन २००६ पासून दरवर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी वैयक्तिक प्रतिष्ठान वर परिवारातील ज्येष्ठ सदस्य तर नसवाला चौकातील श्री दिगंबर जैन मंदिरावर समाजातील ज्येष्ठ बांधवांकडून ध्वजारोहण करण्यात येते. मात्र ही बाब कधीही सामाजिक दृष्टिकोनातून प्रसिद्धीस आली नाही. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शासनाकडून हर घर तिरंगा ही मोहीम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने सुहास चवरे यांचा उपक्रम समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आताच्या संकल्पने पूर्वीच चवरेंनी ती संकल्पना कृतीतून प्रत्यक्षात उतरवली आहे. सुहास चवरे हे माजी नगरसेवक असून श्री दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष तथा श्री विनीत - चंद्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक आहेत. समाजकार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. प्रत्येक धर्मग्रंथ तथा साधु संताचे वाणीतूंन श्रवण केलेल्या समर्पित सेवेला अनुसरून आचरण करीत सर्वप्रथम राष्ट्र, द्वितीय धर्म व नंतर सर्व संसार या उक्तीला आदर्श मानत ते आपले सेवेचे कार्य अखंडपणे करीत आहेत.