Breaking News
recent

जिल्हा परिषद शाळा लोणवडी येथे स्वतंत्रदिन साजरा करून विविध कार्यक्रम संपन्न


मलकापुर प्रतिनिधी

15 ऑगस्ट स्वतंत्रदिनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लोणवडी येथे भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. यावेळी ध्वजारोहण श्रीमती. वंदनाताई बावस्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडला. या नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बोन्डे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धाडे सर यांनी केले. त्यानंतर गावातील माजी सैनिक श्री. श्री शंकर खर्चे. रमेश बराटे व चंद्रकांत पाटील इत्यादी यांचे ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच शाळेच्या वतीने सुद्धा त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे विषयी स्वातंत्र्य दिना विषयी माहिती शाळेतील शिक्षिका कु.चौधरी मॅडम यांनी केले .


   त्यानंतर ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री परिक्षित भाऊ खर्चे यांनी शाळा ISO करण्याचा आपल्या मनोगतातून व्यक्त केले. नंतर विद्यार्थ्यांचा  देशभक्तीपर गीत गायन तसेच स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा कार्यक्रम सादर केला.तसेच देशभक्तीपर गीतांवर लेझीम नृत्य व सामूहिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तरी या वेळी गावात कार्यक्रमाला गावातील सरपंच सौ प्रियंका ताई खर्चे उपसरपंच श्री परीक्षित खर्चे व सर्व ग्रामपंचायत सदस्य.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती वंदनाताई बावस्कार व उपाध्यक्ष श्री प्रवीण वाघ व सर्व सदस्य गावातील माजी सैनिक तसेच गावाचे पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य कर्मचारी व गावातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धाडे सर यांनी केले. अध्यक्ष च्या वतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Powered by Blogger.