जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा दुसरा रुग्ण आढळला
प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलढाणा जिल्ह्यात स्क्रब टायफस आणि स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून येत आहे. यापूर्वी स्वाईन फ्ल्यू मुळे एका व्यक्तीचे निधन झाले आहे. तर आज दुसऱ्या एका व्यक्तीस लागण झाली आहे. लागणर झालेली महिला बुलडाणा शहरातील रहिवासी आहे . स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहे. एक २८ वर्षीय तरुणी स्वाईन फ्लूग्रस्त मिळून आली आहे. सदर तरुणी आरोग्य विभागाशी संबंधित असून ती चिखली रोडवरील काँग्रेस नगर भागात राहते. आतापर्यंत १४ जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात २ जण स्वाईन फ्लू ग्रस्त आढळले आहेत.
स्वाईन फ्लू संसर्गाचे प्रमाण १४ टक्के आहे. सदर तरुणीची स्वाईन फ्लू तपासणी जिल्हा महिला रुग्णालयातील कोविड लॅबमध्ये करण्यात आली. ती आता एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.