गोल्डन डे गोल्डन नाईट वरली मटका ऑफिसवर अप्पर पोलीस अधीक्षकाच्या पथकाचा छापा
![]() |
वरली मटका जुगाराचा खेळ खेळवित असणारे 29 आरोपी यांना जागीच पकडले |
प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी
मा.अप्पर पोलीस अधिक्षक साहेब . खामगाव यांचे पथकाची वरली किंग GOLDEN DAY GOLDEN NIGHT वरली मटका मालक धीरजलाल रूपारेलिया, व पुत्र मेहुल रूपारेलिया यांच्या जुगार च्या ऑफिस वर छापा आज दिनांक 22/09/2022 रोजी मा . अपर पोलिस अधिक्षक साहेब खामगाव यांना माहीती मिळाली की धीरजलाल रूपारेलिया व त्यांचा मुलगा मेहुल रूपारेलिया हा त्याचे चिखली येथील घरात तसेच परिसरात, शहरात 400 रु रोजाने एजंट नेमुन त्यांना वरली मटका जुगार खेळ खेळउन लोकांन कडून पैसे स्विकारुन सदर जुगार आकडे त्याचे चिखली येथे असलेल्या त्याच्या वरळी मटक्याच्या ऑफिस वर मोबाइल फोन द्वारे चालवत आहे
. तसेच तो Golden day व golden night या वरली मटका जुगार मालक असून त्यांनी dpboss.net ही website भड़याने घेऊन त्याचेवार open ,close आकड़े त्याच ऑफिस वर खोलून website वर प्रदर्शित करतात अशा खात्री लायक खबरे प्रमाणे अपोअसा यांनी आदेश दिल्या प्रमाने पथकातील अधिकारी पो उप नी पंकज सपकाळ पो.हे. कॉ गजानन बोरसे ,नापोका रघुनाथ जाधव ,ना पो का गजानन आहेर, संदिप टाकसाळ , राम धामोडे,यांनी सदर जुगार अडया वर महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे छापा टाकून वरली मटका जुगाराचा खेळ खेळवित असणारे 29 आरोपी यांना जागीच पकडले . नमुद आरोपिताकडून वरली मटका आकडे घेण्यासाठी वापरण्यात आलेले 43 मोबाईल ,12 मो सा, 4 प्रिन्टर, / तसेच वरली ,मटका जुगार खेळण्या करीता वपरलेले साहित्य , असा एकूण 8,85,410/-रु वरली मटका जुगाराचा मुद्देमाल व वरली मटका जुगार चालविणारा मालकासह आरोपी विरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाने पो स्टे चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रस्तुत कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सा,बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सा, खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पथकातील अधिकारी, अमलदार यांनी केली आहे.
सदर कार्यवाही ही जुगाराचा मालक व स्वतः आकडे ओपन करून लोकांची फसगत करणाऱ्या पिता पुत्रावर झाल्यामुळे अवेध धंधे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.यात बडे मासे गळालां लागण्यची शयकता नाकारता येत नाही.