Breaking News
recent

थॅलेसीमीयाग्रस्त बालकांसाठी धर्म,पंथ,जात विसरून रक्तदानासाठी पुढे यावे

 


आचार्य वेरुळकर गुरुजी, आ राजेश एकडे व बळीराम महाराज ढोले यांचे समाजातील सर्व घटकांना आवाहन 

  नांदुराः थॅलेसीमीया हा रक्ताशी संबधित एक  असा आजार आहे की यात रुग्णांच्या शरीरात रक्ताची निर्मितीच होत नाही त्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या रक्तावर विसंबून राहावे लागते 

आपल्याही नांदुरा शहर व तालुक्यात जवळपास १५चिमुकले मुले मुली या आजाराने बाधित आहेत खेळण्या बागळण्याच्या वयात त्यांना रक्ताच्या एका बॅग साठी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागते हीच बाब हेरत चंद्रशेखर आझाद क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने ६सप्टेंबर २०२२मंगळवारी सकाळी ९ते दुपारी ३वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (न प टाऊन हॉल) मध्ये आयोजित रक्तदान शिबीरात धर्म,पंथ जात विसरून रक्तदानासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन गुरूदेव सेवाश्रमचे आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरजी,आ राजेश एकडे व खंडोबा भवानी मंदिराचे बळीराम  महाराज ढोले यांनी केले आहे 


धर्म,पंथ ,जात विसरून थॅलेसीमीयाग्रस्त निरागस बालगोपालांसाठी पुढे येऊन रक्तदान करावे जेणेकरून धार्मिक,राष्ट्रीय,सामाजिक कार्य केल्याचे पुण्य मिळेल -आचार्य वेरुळकर गुरूजी 


यावर्षीचा गणेशोत्सव तरुणांनी, युवकांनी आरोग्य उत्सव साजरा करीत थॅलेसीमीया बाधित चिमुकल्यासांठी रक्तदान करून सामाजिक भान जोपासावे -आमदार राजेश एकडे 


रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या रक्ताने जर कुणाचे प्राण वाचले तर त्याहून मोठे पुण्य दुसरे कोणतेच नाही म्हणूनच समाजातील सर्व घटकांनी रक्तदानासाठी बाहेर पडावे -बळीराम महाराज ढोले  खंडोबा भवानी मंदिर ,वसाडी बु

Powered by Blogger.