Breaking News
recent

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

 


प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी

   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चरणसिंग राजपूत यांचे मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)एकनाथराव शिंदे साहेब यांना तसिलदार नांदुरा यांच्या मार्फत निवेदन बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात सुरु असलेला सततच्या पाऊसाने कहरच केला आहे शेतातील पिक पूर्णपणे जमींदोस्त झाले अनेक शेतकार्यान्ची पिके खराब झाले आहे हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिस्काउन घेतले अनेकांच्या शेतात पानी तुम्बले आहे.

   शेतकरी आता शाशनच्या मदतिच्या प्रत्क्षेत आहे शाशनाने कुठलेही निकष न लावता व पंचनाम्यात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर नांदुरा तालुका ओलादुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000/ पन्नास हजाराची रुपये ची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी  अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही चरणसिंग राजपूत यांनी दिला आहे निवेदनावर पवनसिंग राजपूत लखन राजपूत सह्या आहे

Powered by Blogger.