वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे वळती येथील जुन्या घरांचे मोठे नुकसान
![]() |
नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी |
नांदुरा प्रतिनिधी :-
दिनांक १० व ११सप्टेंबर रोजी वळती बु, खुर्द येथे वादळी वाऱ्यासह अतीवूष्टिमुळे गावातील जुण्या दगळ मातीच्या भिंती कोसळल्या असुन गावकऱ्यांचे चे प्रचंड नुकताच झाले.या
नैसर्गिक आपत्ती मुळे झेलेल्या नुकसानाची त्वरीत पाहणी करून नुकसानग्रस्त गावकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून योग्य ती मदत देण्यात यावी किंवा शासकीय योजने चे घरकुल देण्यात यावे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार नांदुरा यांना विनंती पर अर्ज दिला.प्रतीलीपी मा.आ.राजेश एकडे साहेब यांना दिली यानंतर आमदार साहेबांनी लगेच संबधित अधिकाऱ्यांना फोन करून पाहणी करण्याचे आदेश दिले. यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे, ग्रा,प , सदस्य अशोक पाटील,करून कोल्हे,संतोष कोल्हे ,शाम काळे हजर होते