शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
मलकापूर प्रतिनिधी
वडनेर भोलजी येथील ठाकूर पेट्रोल पंपानजीक राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या शेतात २६ सप्टेंबर रोजी सकाळी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वडनेर भोलजी येथील शेतकरी शे. अजिज शेतात गेले असता त्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ त्यांनी नांदुरा पोलीस ठाण्याअंतर्गत वडनेर भोलजी चौकीला दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृताचे वय ४० वर्ष, उंची ५.२ इंच, उजव्या हातावर ऑंखेश असे गोंदलेले आहे. अंगात राखाडी कलरचे टी शर्ट, काळा पांढरा रंग असलेला बरमुडा घातलेला आहे. मृतदेह मलकापूर येथील शीतगृहात ठेवण्यात आला आहे.