चिखली मेहकर रोडवरील कल्याण फाट्यावर अपघात सुदैवाने जीवितहानी टळाली
मेहकर तालुका प्रतिनिधी शिवशंकर मगर
चिखली मेहकर रोडवर कल्याण फाट्याजवळ दिनांक 23 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास फोर व्हीलर क्रमांक एम एच 28 बीके 76 67 या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अपघात झाला.या अपघातामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अपघात इतका भयंकर होता की या गाडीने रोड वरून तीन पलट्या खाल्ल्या म्हणतात ना! देव तारी त्याला कोण मारी?
या उक्तीप्रमाणे गाडी मधील मेरा खात्यावर असलेल्या विसावा धाब्याचे मालक व गाडी चालक गवळी नामक व्यक्ती हे बाल-बाल बचावले. अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले परंतु सुदैवाने बाकी जीवित हानी टाळाली म्हणून गवळी यांनी परमेश्वराचे आभार व्यक्त केले. मी आज जिवंत आहे हा परमेश्वरामुळेच त्यांनीच मला त्यांची सेवा करण्यासाठी उर्वरित आयुष्य दिले अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.