शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर अटीतून मुक्त करा.... रयत क्रांती पक्षाची मागणी
![]() |
कर्ज वितरित करतांना शेतकऱ्यांना सिबील स्कोअरची अट शिथिल करा.---केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लेखी निवेदन |
चिखली - मनोज जाधव
दि. २४ सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दौंड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतांना रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोर( क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) यापासून मुक्तता मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना कळवले आहे.
शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे रोजच्या रोज न मिळता काहींना तीन महिन्यानंतर, सहा महिन्यानंतर, बारा महिन्यानंतर, अठरा महिन्यानंतर शेतमाल विकल्यानंतर पैसे मिळतात, त्यातही अनेक वेळा शेतीमालाचे बाजारभाव पडल्यामुळे, शेतीमालाचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही.
तसेच ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ, वादळ,गारपीट, कोरोना महामारी सारखे जागतिक दर्जाचे महामारी यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे वेळेत न मिळाल्यामुळे शेतकरी बँक सहकारी असो, खाजगी असो, सरकारी असो, अथवा फायनान्स असो.
याचे कर्जफेडीचे हप्ते वेळेत भरू शकत नाही,त्यामुळे विनाकारण शेतकऱ्यांचा सिबिल बँक रिपोर्ट खराब होतो, मग पुढच्या वेळेस बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात,
या सर्व प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा काहीच दोष नसतो त्यामुळे शेती कर्ज, शेती उद्योग कर्ज, शेती औवजार, शेती यंत्र, शेतघर, विहीर, सिंचन कर्ज अथवा कोणत्याही प्रकारचे शेती कर्ज असेल तर त्या कर्जाला सिबिलची अट नसावी फक्त बाकी आहे का नाही एवढंच पाहिलं जावं.तेव्हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल व या पद्धतीने शेतकऱ्यांना कर्ज वाटप व्हावे,
यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारामन यांना रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांच्यातर्फे शेतकरी हितार्थ लेखी निवेदन देण्यात आले आल्याचे रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.