Breaking News
recent

सततच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान,तरीही अडगांव मंडळ यादीत नाही



पैसा ओतला जमिनीत

खचून गेले बळ,

आरपार काळजात

ओल्या दुष्काळाची झळ ....


   सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेनासे झाले आहे. सततच्या पावसामुळे सर्व पिके पाण्यात उभी आहेत. सोयाबीन पिकांचे बेहाल झाले आहे. सोयाबीन पिकाच्या शेंगा काळ्या पडत आहेत तर काही शेंगातून कोंब बाहेर निघाली आहेत. झाडांना पाने सुध्दा राहली नाहीत.कपासी पिकाला अनेक रोगांनी ग्रासुन टाकले आहे. उडीद व मुंगाच्या शेंगा तोंडात टाकायला सुद्धा नाहीत. अशी परिस्थिती अडगांव बु.।। मंडळात झाली आहे.तरीही २४ मंडळाच्या यादी अडगांव मंडळाचे नाव नाही. कोणत्या निकषावर पिक विमा कंपनी हे निकष लावते हे न  समजणारे कोडेच आ वासुन शेतकऱ्यांनसमोर उभेच ठाकले आहे.

     या वर्षी दोन,तिनदा शेतकऱ्यांना पेरणी करावी लागली. रा.खते व बियाण्याच्या आकाशाला भिडलेल्या किंमती यातच शेतकरी पार खचून गेला आहे. त्यात सततच्या पावसामुळे सर्व पिके पाण्या खाली गेली आहेत. आता शेतकऱ्यांनी रडाव की,आत्महत्या कराव असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात प्रधानमंत्री पिक विमा कंपनी सुध्दा शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. शेतकऱ्यांन करीता नव्याने आलेले मायबाप महा.सरकार पण काही करेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्सुरन्स पिक विमा कंपनी कडून पिक विम्याची भरपाई व शासना कडून हेक्टरी पन्नास हजाराची मदत शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर येवून लढावे लागेल असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

कोणतीही कंपनी ज्या वेळी निर्माण होते तिचे केंद्रक स्वार्थ ला धरून असते. विमा धारकाचे हित हे दुय्यम असते. कमीत कमी लोकांना वाटप द्यावे आणि जास्तीत जास्त लोक वंचित राहावे हा उद्देश ग्राहय धरून कंपनी प्रतिनिधी कार्य करीत असतात. अशातच शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक राहणे आवश्यक आहे. विमा काढताना कंपनी च्या अटी व शर्थी बाबत जनजागृती करणे व ज्ञान आत्मसात करणे हे शेतकरी वा शेतकरी पुत्राची गरज ठरलेली आहे याचा अभ्यास त्यांनी केला व वेळोवेळी आवश्यक असलेली माहीती विमा कंपनी ला दिल्यास शेतकऱ्यांना विमा मिळण्याच्या तांत्रिक अडचणी वर सहज मात केल्या जाऊ शकते. लक्ष्मीकांत कौठकर जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना जिल्हा अकोला


Powered by Blogger.