आता लक्षपूर्ती हेच ध्येय -अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत.
प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या चांदूरबाजार येथील विदर्भ प्रांताचे त्रैमासिक बैठकीत ठरल्याप्रमाणे विदर्भातून ११००० सदस्य करण्याचे केंद्राने लक्ष दिले होते.आतापर्यंत केंद्रीय पदाधिकारी, प्रांत पदाधिकारी , बहुतेक जिल्हा कार्यकारिणी सदस्य व काही तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यांची सदस्य म्हणून नोंदणी झाली आहे.
आतापर्यंत नोंदणी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रांताच्या निर्धारित सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होत आपल्या लक्षपूर्तीच्या दिशेने कार्यारंभ करुन निर्धारित वेळेपूर्वीच हे लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रांताध्यक्ष डॉ.नारायणराव मेहेरे , प्रांत संघटनमंत्री डॉ.अजय गाडे ,व प्रांत सचिव नितीन काकडे यांनी विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे.
सर्व जिल्ह्यांतील अध्यक्ष,संघटक व सचिव तसेच वेगवेगळ्या विषयांचे विदर्भ प्रांत प्रमुखांनी व जिल्ह्यातील प्रतिनिधी यांनी यांत महत्वाची भुमिका बजावत आपल्या प्रांताचे स्विकारलेले हे कार्य पूर्णत्वास न्यावे यासाठी आता ते सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील त्याला ग्राहकांनी आपल्या अधिकारांची व आपल्यासाठी व असलेल्या कायद्यातील तरतुदी समजून घेत ग्राहक पंचायत च्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावे व सदस्यत्व स्विकारुन ग्राहक जागृतीच्या अभियानात सहभाग नोंदवला अशी अपेक्षा विदर्भ प्रांत पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.