स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये नवरात्र उत्सव संपन्न
मलकापूर प्रतिनिधी
(सीबीएससी) मलकापूर येथे दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील नवरात्री उत्सव मोठ्य उत्साहमय वातावरणात साजरा करण्यात आला. हा उत्सव दरवर्षी नवरात्रीच्या औचित्याने साजरा करण्यात येतो.या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुदिप्ता सरकार व शाळेचे
उपमुख्याध्यापक श्री केदार शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते मा दुर्गेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. तसेच कु. श्रुती चौधरी आणि रिया पाटील हिने आपल्या भाषणाच्या आधारे दुर्गा पूजा व नवरात्रीउत्सवाचे महत्त्व सांगितले. शाळेतील बाल कुमारिकांनी नवदुर्गेची वेशभूषा सादर केली,
त्यात पूर्वा चिम(स्कंदमात), विधी अग्रवाल (शैलपुत्री), शनाया पारख (कात्यायनी), अनया पारख (कुष्मांडा), साची चौधरी (ब्रह्मदींनी), अनुष्का वानखेडे(महागौरी), आराध्या झोपे (चांद्रघटा), आरोही खडसे(काळरात्री), आराध्या पाटील(दुर्गामाता) तसेच अर्षिता व दिव्या चांडक यांनी नवदुर्गांची वेशभुषा करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी आपल्या मनोगताच्या आधारे नवरात्रीची पूजा व महती सांगितली या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आर्या गाणेकर व आयुष्य पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्राची मोरखडे हिने केले. हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.