मलकापूर नगराचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव संपन्न
मलकापूर नगराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला प. पू. डॉक्टर हेडगेवार सभागृहा समोरील प्रांगणात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री मा. श्री. गोविंदजी शेंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मेजर मा.श्री नामदेवराव पाटील हे लाभले होते तसेच व्यासपीठावर मा. तालुका संघचालक श्री विनायकराव पाटील व मा. नगर संघचालक श्री दामोदरजी लखानी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहनाणे व प्रार्थनेणे करण्यात आली. त्यानंतर प्रमुख वक्ते व अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.
यावेळी नगरातील स्वयंसेवकांनी सूर्यनमस्कार, मनोरे, प्रगत दंड, अशा विविध नेत्रदीपक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यानंतर व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्यवरांचा परिचय तसेच आभार प्रदर्शन मा. तालुका संघ चालक श्री विनायकराव पाटील यांनी केले.यानंतर प्रमुख अतिथी श्री नामदेवराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की संघात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत देशभक्ती ,बंधुप्रेम व शिस्तपालन व समजऋन फेडण्यासाठी नागरिकांनी संघाशी जुडने आवश्यक आहे.
तसेच "अग्निवीर" या महत्त्वाकांक्षी योजनेत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देश कार्य करावे असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.याप्रसंगी प्रमुख वक्ते माननीय श्री गोविंदजी शेंडे आपल्या उद्बोधनात म्हणाले विजयादशमीच्या पवित्र पावन पर्वावर १९२५ मध्ये संघाची स्थापना प.पु. डॉ. हेडगेवार यांनी केली हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हीच संघाची भावना आहे. जगात अनेक संस्कृती, सभ्यता आहेत. त्यामध्ये अतिप्राचीन भारतीय संस्कृती आहे. प्रभू रामचंद्राची ही भूमी आहे हिंदू हा शब्द राष्ट्रवाचक आहे हिंदुस्तान हा हिंदूंचा आहे. विश्वबंधुत्वाचे व जगाचे कल्याण हा आमचा संकल्प आहे व हा विचार जिवंत राहण्यासाठी संघाचे कार्य आहे. पुढे ते म्हणतात भारतात अनेक समस्या आहेत त्यापैकी धर्मांतरण व लवजिहाद प्रमुख समस्या निर्माण झाल्या आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लढा देऊन स्वयंसेवकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २०२५ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या काळात संघाने काय साध्य केले तर प्रभू श्री रामचंद्राच्या रामजन्मभूमीचा प्रश्न सोडविला व प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिमुक्त केली" गर्व से कहो हम हिंदू है" हा भाव समाजात रूजवीला .गोहत्या, गोतस्करी अशा अनेक समस्यांना आळा घालण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की ब्रिटिश काळातील इंग्रजी शिक्षण संस्थेने भारतीय समाज अधोगती ला जात आहे त्यामुळे संघाने विद्याभारती ही स्वदेशी शिक्षण देणारी संस्कार क्षम पिढी घालवणारी राष्ट्रप्रेम निर्माण करणारी संस्था स्थापन केली. आम्हाला आपला गौरवशाली इतिहास सांगण्याच्या ऐवजी आत्मग्लानी युक्त इतिहासाचे शिकवण दिल्या गेली त्यामुळे आता अचूक व गौरवशाली इतिहास संकलनाचे कार्य सुद्धा सुरू आहे व नवीन शैक्षणिक धोरणामध्ये यावर अंमलबजावणी केल्या जाणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षात गाव तेथे शाखा स्थापन कराव्या हे कार्य करण्यासाठी समाजाला संघटित करायचे कार्य राष्ट्रीय संघ करत आहे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी सांघिक गीत श्री राजेंद्रजी पांडे यांनी तर वैयक्तिक गिताचे गायन श्री भरतजी देशमुख यांनी केले. संस्कृत सुभाषित श्री आशिषजी महाजन यांनी तर अमृतवचन श्री सुरजजी परदेसी यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे मुख्य शिक्षक म्हणून श्री पंकजी शुक्ल यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला नागरातिल प्रतिष्ठित नागरिक तथा माता-भगिनी व स्वयंसेवक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.