आम आदमी पार्टीच्या दौंड तालुका युवा अध्यक्षपदी यवतचे सामाजिक कार्यकर्ते पोपट शिवाजी लकडे यांची निवड
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - आम आदमी पार्टीच्या (आप) दौंड तालुका युवा अध्यक्षपदी यवतचे सामाजिक कार्यकर्ते पोपट शिवाजी लकडे यांची निवड करण्यात आली असुन आपचे दौंड तालुका संयोजक रवींद्र जाधव यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले.
पोपट लकडे यांच्या सामाजिक कामातील योगदान व नेतृत्वगुण पाहून पुणे जिल्हा संयोजक मुकुंद किर्दत यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली. राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून दौंड तालुक्यात भ्रष्टाचार मुक्त कार्य करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच मार्केटमधील प्लास्टिकच्या फुलांच्या विरोधात त्यावर बंदी आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे पोपट लकडे यांनी सांगितले.