धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर
श्री शिवाजी हायस्कूल इसोली ता. चिखली जि. बुलढाणा येथील शिक्षक श्री. हिरा गवई यांना स्व. श्री.श्रा.स.बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार लायन्स क्लब खामगाव व धन्वंतरी चॅरिटेबल मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने १ऑक्टो २२ला खामगाव येथे प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५००१रु, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह,वृक्ष,शाल,श्रीफळ देऊन उभयतांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारातून मिळालेल्या पाच हजार रुपयांचा उपयोग वैयक्तिक कामासाठी न करता ज्या विद्यार्थ्यांमुळे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्या विद्यार्थ्यांसाठी पुरस्कारातून मिळालेले ५०००रू.व स्वतः जवळचे ५००० रु असे १००००रू धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुख्याध्यापक .एस. एस. जाधव इसोली यांच्याकडे सुपूर्द करून आदर्श अर्बन शाखा ईसोलीमध्ये एफडी च्या स्वरूपात फिक्स करण्यात आले . या व्याजाच्या रकमेतून इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.
आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक हि रा गवई हे विद्यार्थी प्रिय शिक्षक असून अडीअडचणीतील विद्यार्थ्यांना अनेकदा शैक्षणिक व आर्थिक मदत करतात .शाळेमध्ये शिकवताना विविध उपक्रम राबवतात.उदा. विद्यार्थ्यांच्या हजेरीच्या वेळेस एससर किंवा प्रेझेंट सर न म्हणता विद्यार्थ्यांने आपले नाव आले असता एका इंग्रजी शब्दाचा उच्चार करणे यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढतो . विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती कमी होते.वर्गामधील केवळ हुशार विद्यार्थ्यांकडून वाचन किंवा विविध उपक्रम करून न घेता हजेरितील नंबर नुसार सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांना नीट लिहिता वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत अतिरिक्त तास घेणे अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना ते आपलेसे करतात.सोबतच विविध वर्तमानपत्रातून नियमित त्यांचे अनेक लेख व कविता प्रकाशित होतात.
सदर स्व.श्री.श्रा.स. बावस्कर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कारा निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. पी.एस.वायाळ सर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ विभाग सहसचिव राज इंगळे , जिल्हाध्यक्ष सौ वर्षा इंगळे, प्रवीण काकडे, मुख्याध्यापक एस.एस जाधव,एन.एस.गायकवाड, माणिकराव गवई ,प्रशांत डोंगरदिवे,आदर्श अर्बन परिवार, शिव परिवार , नागसेन परिसर मित्रपरिवार बी.एड.बडीज मित्रपरिवार, अक्षर साधना साहित्य संघ चिखलीचे सर्व पदाधिकारी, संत कबीर पतसंस्था संचालक मंडळ , बहिष्कृत भारतचे सर्व प्रतिनिधी ,सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून हि.रा.गवई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर पुरस्कार त्यांनी नातेवाईक,मित्रमंडळी व आजी-माजी विद्यार्थ्यांना समर्पित केला आहे.