सरपंच मागणीनंतर अखेर निपाणा गावात दिवाळीनंतर पोहोचला आनंदाचा शिधा
मोताळा/प्रतिनिधी
तालुक्यातील निपाणा येथील सरपंच सौ.शारदा संतोष तांदुळकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. अखेर पंधरा दिवासाच्या कालावधी नंतर दि.११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गावातील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधाचे नागरिकांना वाटप करण्यात आले. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर हा शिधा घेण्यासाठी गोरगरीब नागरिक आता काम धंदे सोडून दिवस दिवसभर राशन दुकानदारांचे उंबरठे शिजवत आहे. मात्र यामध्ये कुठेही आनंद दिसून आला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य शासनाने दिवाळीच्या काही दिवसा अगोदर कोणतेही
नियोजन न करता, गोरगरीब जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी मोठा गाजावाजा व मात्र जाहिरात बाजी करत १००रु. रवा, चना दाळ, तेल, असा 'आंनदाचा शिधा' देण्याची घोषणा केली. मात्र हा शिधा दिवाळी आगोदर मिळायला पाहिजे होता. परंतू दिवाळीच्या दिवशी सुद्धा हा शिधा गरिबांना मिळाला नसल्याने जनतेची दिवाळी कडू झाली. यामुळे गरिबांनी शासनाच्या या तुकलुघी कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले व अखेर हा 'आनंदाचा शिधा' तब्बल दिवाळी उलटल्यानंतर पंधरा दिवसांनी वाटप करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ.शारदा संतोष तांदुळकर, उपसरपंच प्रकाजी थाटे, ग्रामपंचायत सदस्या सौ.छाया विनोद तायडे, प्रकाश चौधरी, स्वस्त धान्य दुकानदार श्री.व्हि के राजपूत, लाभार्थी श्रीमती सुरेखा राजु थाटे, प्रमोद चौधरी यांच्यासह सर्व गावकरी मंडळींनी लाभ घेतला. आनंदाचा शिधा उशिराका होईना गावात पोहचल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने महसूल विभागाचे आभार मानण्यात आले. या आनंदाच्या शिधासाठी गोरगरीब जनता खूप त्रस्त झाली आहे. यामुळे दिवाळी गोड तर झाली नसून घास कडू झाली असल्याचे नागरिक बोलत आहे.