Breaking News
recent

शौचालयाच्या खड्ड्यात बुडून दोन वर्षीय चिमुकल्याचा अंत , दसरखेड येथील घटना



प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी

   मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील रहिवासी गणेश इंगळे यांचा दोन वर्षे मुलगा शौर्य गणेश इंगळे वय दोन वर्ष दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घरकुल साठी तयार करण्यात आलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की दसरखेड येथील गणेश इंगळे व शशिकला इंगळे यांचा दोन वर्षे मुलगा शौर्य गणेश इंगळे घरकुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खेळत होता आई आजारी असल्यामुळे घरातच झोपलेली होती तर वडील पाणी घेण्यासाठी एक्वा प्लांट वर गेले असता खेळता खेळता शौर्य बांधकाम सुरू असलेल्या शौचालयाच्या पाणी भरलेल्या खड्ड्यात पडला वडील घरी आल्या नसतं आल्यानंतर शौर्य कुठेच दिसून आला नाही शोधाशोध केली असता तो संचालयाच्या खड्ड्यात पडल्याचे लक्षात आले. 

वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने चिमुकलेला बाहेर काढून त्वरित मलकापूर येथील डॉक्टर वराळे यांच्या दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.एक दिवस अगोदर म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी शौर्यचा दुसरा वाढदिवस साजरा झाला होता वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी चिमुकल्याचा पाण्यात बुडून अंत झाल्याने सर्व दूर हळहळ व्यक्त होत आहे.


मयत :- शौर्य गणेश इंगळे  वय 2 वर्ष रा. दसरखेड .. घरकुलाचे बांधकाम सुरू होते शौचालय चा खड्डात  पडुन मुत्यु .. विशेष म्हणजे 02/11/2022 रोजी दुसरा वाढदिवस झाला

Powered by Blogger.