Breaking News
recent

लेखणीच्या माध्यमातून पत्रकार सतीश दांडगे तळागाळातील अन्यायग्रस्तांना न्याय देणारे योद्धा-- धनश्रीताई काटीकर


    आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे तसेच गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे खरे पत्रकार सतीश दांडगे यापुढे देखील असेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळून द्यावा असे प्रतिपादन दैनिक अहिल्या राज  संपादिका धनश्रीताई काटीकर  यांनी पत्रकार सतीश दांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना व्यक्त केले आहे.

    यावेळी पत्रकार सतीश डांगे यांच्यावर वाढदिवसानिमित्त अभिनंदन यांचा वर्षाव करण्यात आला त्यावेळी तहसीलदार राजेंद्र सुरडकर, नगराध्यक्ष एडवोकेट हरीश रावळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अरुण भाऊ अग्रवाल, एडवोकेट एस बी पाटील, यांनी सत्कार केला तर हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने  संपादक धनश्रीताई काटेकर उपसंपादक करणसिंग सिरस्वाल हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे अजय टप,विदर्भ प्रसिद्ध प्रमुख,जिल्हाध्यक्ष गौरव खरे, तालुकाध्यक्ष  उल्हास शेगोकार, नथुजी हिवाळे , परमादेश संपादक प्रा. कृष्णा मेसरे, श्रीकृष्ण भगत ,योगेश सोनवणे, धर्मेशसिंग राजपूत, अपरेश तूपकरी, कैलास काळे, सय्यद ताहेर ,ख्याजा कुरेशी ,जेष्ठ पत्रकार जमिल भाई, गजानन ठोसर शिवसेना शहराध्यक्ष,पत्रकार हनुमान जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर इंगळे, तसेच अपंग जनता दल च्या वतीने पत्रकार दांडगे यांना पुष्पगुच्छ देऊन केक कापण्यात आला त्यावेळी अपंग संघटनेचे अध्यक्ष कलीम शेख, आधी अपंग बांधव उपस्थित होते तर दर्पण मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने शाल टोपी देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी मराठा दर्शन चे संपादक नारायण पानसरे, धीरज वैष्णव, उमेश ईटणारे आधी पत्रकार उपस्थित होते. तर सकाळपासूनच राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बांधवांनी अभिनंदनाचा  वर्षाव केला आहे.

Powered by Blogger.