साईनगर येथील २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा
प्रतिनिधी
मलकापूर शहरातील साईनगर येथील २४ वर्षे तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक १० ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की बीधनाथ रामगरीब कानोजीया वय २४ वर्ष राहणार साईनगर या तरुणाने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घराला तीन रूम असताना समोरच्या घरांमध्ये संपूर्ण कुटुंब बसलेले होते याचीच संधी साधून त्याने मागच्या घरामध्ये जाऊन साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्याच्या भावाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला खाली उतरून उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता पाठविण्यात आला.