Breaking News
recent

शिवसेनेच्या मशाल यात्रेने मलकापूर भगवेमय जय भवानी, जय शिवरायच्या जयघोषाने दुमदुमला आसमंत



मलकापूर 

 शिवसेना तालुका व शहर कार्यकारिणीच्यावतीने शनिवारी आयोजित मशाल यात्रेने मलकापुर भगवेमय झाले.  जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा, उद्धव साहेब तुम आगे बढो, हमारा मुख्यमंत्री कैसा हो उद्धव साहेब जैसा हो अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमला.  भारतीय राष्ट्रीय कँग्रेसच्या वतीने मशाल यात्रेचे स्वागत करण्याकरिता शहराध्यक्ष तथा मा. नगरसेवक राजू पाटील,  सुहास चवरे, अनिल गांधी यांनी महविकास आघाडीतर्फे हजेरी लावली. शिवसेना पदाधिकारी यांचा सत्कार केला. मशाल पेटविण्याचा मान सुहास चवरे यांना मिळाला. मलकापूर बसस्थानकापासून हनुमान चौक ते तहसील चौक ते गाडगेबाबा पुतळा या दरम्यान लागणारे तहसील चौक येथील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर श्री. संत गाडगेबाबा पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.  जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी मार्गदर्शन केले. तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी आभार मानून मशाल यात्रेची सांगता केली.

यावेळी जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील, शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी तालुका प्रमुख एकनाथ डवले, विधानसभा संघटक राजुसिंग राजपूत, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपप्रमुख मंगेश सोनोने, तालुका संघटक अक्षय रायपुरे, युवासेना तालुका प्रमुख गणेश सुशिर, युवासेना शहर प्रमुख पवन गरुड, युवासेना उपशहरप्रमुख आकाश बोरले, सचिव शे. यासीन, मुस्ताक खान पठाण, बाळूभाऊ कुयटे, शिवाजी घोराड, अर्जुनराव कुयटे, दीपक कोथळकर, प्रा. कृष्णा मेहसरे, संतोष पाटील, अतुल भगत, रामा खापोटे, नारायण तायडे, विश्वनाथ पूरकर, आदित्य पुरकर, शांताराम धाडे, सुभाष बावस्कर, अमित धाडे, सुशील धाडे, मो. इसाक तेली, हरिदास गनबास, इरफान तेली, सुमितभैया गनबास, शिवम ढोले, सागर, विवेक धाडे, शुभम साळुंके, पुंजाजी तायडे, रामराव तळेकर, रामभाऊ थोरबोले, बाळूभाऊ पोळखरे, पांडुरंग चीम, अमित राजपूत, संतोष घाटोळ, समादभाई कुरेशी, करण राजपूत, अभय कोलते, ऋत्विक पाटील, अभिषेक नारखेडे, विशाल चांभारे,अजय इंगळे, योगेश बावस्कार, मयुर ताटर, अतूल तांदूळे, निलेश ढोले, क्रिष्णा सनिसे, आकाश हांडगे, सुपडा पाटील, गणेश तारापुरे, वैभव सोनोने, प्रविण भारंबे, भुषण ढोले, अभिषेक ढोले, यश राजपुत, मयूर कोलते, नासिर खान, सूशिर ठाकरे, आकाश बोरसे, अभिषेक ढोले, अतूल गोसावी, अक्षय गंतीरे, सुपडा पाटील, दुर्गेश सनिसे, मुश्ताक पठाण, रमेश तांगडे, इमाम शहा, सै. वसिम, तसलीम शेख, युनिस कुरेशी, खलील कुरेशी, वसीम सय्यद, कलीम कुरेशी, नईम कुरेशी, कलीम खान, तनवीर  कुरेशी, तसलीम शेख, नसीर कुरेशी, ईमाम शाह, ऐजाज शेख, जलालोदीन चव्हाण, महादेवभाऊ यांच्यासह असंख्य शिवसैनिक हजर होते.


Powered by Blogger.