उन्नती महिला पतसंस्थेत घोटाळा उघड होत घोटाळेबाजाचे बिंग फुटले
![]() |
ठेवीदारांनी व्यवस्थापक व अध्यक्ष यांना घातला घेराव बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज हे कर्ज नेमके कोणी उचलले हे अजून जाहीर नाही |
उन्नती महिला पतसंस्था येथे मागील 8 महिन्यापासून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी एकमेकावर आरोप करणाऱ्या व्यवस्थापक व अध्यक्ष यांना सहाय्यक निबंधक व मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी अखेर एका ठिकाणी आणून नेमके प्रकरण काय व कोणी अपहार केला आहे याचे पुरावे मागितले या निमित्ताने कर्मचारी व व्यवस्थापक यांनी ठेवीदारांसमोर कर्जाच्या काही फाईल समोर ठेवण्यात आल्या व काही हाताने लिहिलेले कागद समोर दिले त्यात 4 कोटी 20 लाख रुपयांचे व्याजासहित कर्ज अध्यक्ष व बँकेतील कर्मचारी यांचेकडे थकबाकी असल्याचे स्पष्ट दिसून आले यात अजून व्यवस्थापक व त्यांचे पत्नीचे नावावर 50-50 लाख एक कोटी रुपयांचे लोन घेतले असल्याचे समोर आले मात्र यात एक विशेष उन्नती महिला बँकेची कर्ज देण्याची मर्यादा 5 लाख असतांना तेथे कोट्यावधी रुपयांची कर्ज प्रकरणे हे कर्मचार्यांच्याच नावावर दिसून आलेत परंतु ही कर्ज प्रकरणे अंकेक्षक यांच्या आशीर्वादाने झाल्या असल्याचे सुध्दा यावेळेस दिसत आहे
मात्र या कर्ज प्रकरणांबद्दल व्यवस्थापक व अंकेक्षक यांनी संगनमताने संचालक मंडळाला गाफील ठेवण्यात यांना एवढे वर्ष यश आले. हे विशेष आणि त्यातील उन्नती महिला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळाला दरवर्षी अंकेक्षण अहवाल पाठविण्यात येत होता त्या अहवालात बँकेला नेहमी अ वर्ग देण्यात आला होता परंतु उन्नती महिला पतसंस्थेचे बरेच संचालक हे मोठं मोठी व्यवसाय सांभाळणारी असताना सुद्धा यांना गाफील ठेवण्यात आले की या संचालक मंडळातील त्या लोकांचेही हात ओले झाले असतील हा मुद्दा येथे उपस्थित होत आहे.
येथील काही ठेवीदार हे आपले हातमजुरी करणारे आहे त्यांतील अनेक ठेवीदारांची कोणच्या मुला मुलींची लग्न आहेत तर कोणाचा दवाखाना असे एक ना अनेक कारणे येथे उपस्थित ठेवीदारांनी आमच्या प्रतिनिधी समोर व्यक्त केली मात्र एवढा ठेवीदारांचा आक्रोश असतांना एक ना अनेक तक्रारी सहाय्यक निबंधक यांचे कडे केलेल्या असतांना देखील सहाय्यक निबंधक यांनी त्या बँकेचा ताबा हा चोराच्याच हातात ठेवला असल्याचे पाहवायाला मिळत होता. मात्र आज या प्रकारात सहाय्यक निबंधक यांनी या उन्नती महिला पातसंस्थेच्या या कारभारात हस्तक्षेप केला असुन त्यांनी हा प्रकार जाणुन घेतला तसेच मलकापूर पोलीस निरीक्षक हे सुद्धा हजर राहुन यांनी सुद्धा सर्व प्रकारात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे
याचाच निष्कर्ष काढण्याकरिता मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहाय्यक निबंधक यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून सर्व संचालक मंडळाला विनंती करून बैठक घेण्यात आली या बैठकीला ठेवीदारांचे 5 प्रतिनिधी व मीडिया प्रतिनिधी सुद्धा उपस्थित ठेवण्यात आले होते या बैठकी दरम्यान व्यवस्थापक व अध्यक्ष यांनी उचललेल्या कर्जाची रक्कम 8 दिवसात भरून 3 संचालक व 3ठेवीदार यांच्या अध्यक्षतेखाली रक्कम जमा होताच पहिल्या टप्प्यात डेली रिकेरिंग 5 हजारा आतील यांचे वाटप करावे व बाकी कर्जाची वसुली तातडीने करून लवकरात लवकर त्याचे वाटपाचे नियोजन करावे असे निर्देश सहाय्यक निबंधक यांनी दिले तर पोलीस निरीक्षक विजयसिह राजपूत यांनी सर्व ठेवीदारांना शांततेचा भंग न करता संचालक मंडळ व कर्मचारी यांना काम करू द्यावे अन्यथा आम्हाला आमचे कार्य करावे लागेल असे या निमित्ताने सांगितले. मात्र ह्या सर्व प्रकारात लवकरात लवकर मार्ग निघावा अन्यथा ठेवीदार यांचा संयम सुटेल आणि मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .