Breaking News
recent

जिल्ह्यातील ५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

 



    बुलढाणा विशेष पोलिस महानिरीक्षकांनी राज्यातील पोलिस निरीक्षक, निशस्त्र पोलिस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश आज काढलेआहेत. या बदल्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पाच निरीक्षकांचा समावेश आहे.शुक्रवार करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये बोराखेडी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची बदली जळगाव जिल्ह्यात करण्यात आली आहे. पारपत्र विभागात कार्यरत असलेले दिलीप शंकरराव वडगावकर यांची बदली नागपुर येथे झाली आहे. 

    जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे सुनिल प्रल्हादराव अंबुलकर यांची बदली जालना येथे झाली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक अलका भास्करराव निकाळजे यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे झाली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गुलाबराव परशराम वाघ यांची बदली झाली असून त्यांची पदस्थापना मात्र अद्याप प्रतिक्षेत आहे.

Powered by Blogger.