Breaking News
recent

युवा पिढी वाचवण्या करिता अवैध दारू विक्री, वरली मटका व जुगार चे धंदे तातडीने बंद करणेकरिता कारवाई करण्याचे निवेदन


    धरणगांव येथील नागरीक निवेदन सादर करतो की, आमचे गावाची परंपरा राहीली आहे की, गावातील प्रत्येक नागरीक सुसक्षीत तसेच नोकरवर्गा मध्ये आहे. गावामध्ये मराठी शाळा आहे. मुख्य रस्त्याला लागुन अवैध दारूचे व वरलीचे दुकान आहे. सदरचे दुकान हे अवैधरित्या दारूची विक्री केल्या जाते व वरलीमटक्याचे दुकाने सुध्दा तेथेच लावलेले आहे त्यामुळे तेथे मराठी शाळा जवळच असल्यामुळे लहान मुलांना त्यापासुन शिक्षणास त्रास होत आहे. तसेच अवैध दारू विक्रीमुळे मजुरीचे काम करणारे लोकं हे सुध्दा दारूचे अतिशय व्यसनी झालेले आहेत त्यामुळे - त्यांच्या कूटूंब उध्दवस्त होण्याचे मार्गावर आहे. 

     त्यामुळे सामाजिक शांतता भंग झालेली आहे. आणि तरूण मुले सुध्दा दारूचे व्यसनी झालेले आहेत. आणि गावातील तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष सुध्दा अवेध दारू विक्रीसाठी दारूचे मालाचा पुरवठा रस्त्यालगत असलेल्या पानटपरी यांना पुरवठा करीत असतात आणि त्याविरूध्द तक्रार करण्यासाठी त्यांचेकडे गेलो असता ते सुध्दा कोणत्याही प्रकारची आमची तक्रार घेत नाही व त्यांचेवर कारवाई सुध्दा करीत नाही आणि उलट त्यांना अवैध दारू विक्रीसाठी मदत करतात . याअगोदरही आम्ही तक्रारी केल्या असुन त्या तक्रारीची आजपर्यन्त काहीही चौकशी झालेली नाही. अवैध दारू विक्री व वरलीमटक्याची दुकाने बंद करून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी याकरिता आम्ही सदरची तक्रार देत आहे. सदरचे तक्रारीवर ७ दिवसाचे कोणतीही चौकशी न झाल्यास आम्हाला तहसिल कार्यालय मलकापुर चे समोर आमरण उपोषनास बसावे लागेल याची नोंद घ्यावी.असा प्रकारचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिनांक १४/१२/२०२२ रोजी निखील राजेंद्र झनके. देवीदास विलास झनके. तुषार बाळु झनके  व इतर नागरीक सर्व रा.धरणगांव ता.मलकापूर जि.बूलढाणा. यांनी अड. स्नेहल तायडे यांच्या मार्गर्शनाखाली दिले.

Powered by Blogger.