पोटळी येथील 45 वर्षीय व्यक्ती बेपत्ता
नांदुरा तालुक्यातील पोटळी येथील 45 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद 14 डिसेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. पोटळी येथील सुरेश ओंकार सपकाळ हा 45 वर्षीय व्यक्ती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आले आहे.