मनार्डी रसत्यावर दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात १ ठार
मतिन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर
संग्रामपुर तालुक्यातील मनार्डी रसत्यावर दुचाकी घसरुन ३८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मुत्यू झाला.सदर घटना दि १३ डिसेंबर रोजी रात्री साळे बारा वाजताच्या सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव उमेश सुरेश लवाटे आहे. मनार्डी येथील ३८ वर्षीय युवक उमेश सुरेश लवाटे पुणे येथे कंपनी मध्ये नोकरी करित होता. नातेवाईकांना भेटण्यासाठी गावाकडे १ दिवसापुर्वी आले असतांना हा अनर्थ घडला. वरवट बकाल येथुन गावाकडे दुचाकीने जात असतांना मनार्डी रसत्यावर गावाच्या हाकेच्या अंतरावर दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात उमेश लवाटे यांचा जागीच मुत्यू झाला. तामगाव पोलीसांनी पंचनामा करुन श्वविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात मनार्डी येथे आज १४ डिसेंबर रोजी अंतीम संस्कार करण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी मुलगी मुलगा भाऊ आप्त परिवार आहे ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार दयाराम कुसुंबे करित आहे