Breaking News
recent

राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाची 16 डिसेंबरला शेगाव येथे नियोजन बैठक

 

नागपूर विधान भवनावर 26 डिसेंबरच्या मोर्चात विविध संघटना होणार सहभागी


शेगाव (ता.प्र)भोई समाजाच्या विविध मागण्याकरिता राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने नागपूर विधान भवनावर सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाच्या नियोजनाकरिता  शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी हॉटेल शिवालय गजानन महाराज वाटिकेजवळ खामगाव रोड शेगाव येथे सकाळी 11 वाजता राज्यव्यापी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, या मोर्चात महाराष्ट्रातील अनेक संघटना यांनी पाठिंबा दिला असून या सर्व संघटना मोर्चात सहभागी  होत आहेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे कार्यकारी अध्यक्ष अनिल घटमाळ विदर्भ अध्यक्ष अडव्होकेट अमोल बावणे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखडे ,अखिल भारतीय मछूवारा संघटनेचे अध्यक्ष अडव्होकेट शंकरराव वानखडे,विदर्भ भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष उंकडराव सोनवणे, राजाराम मात्रे, अखिल महाराष्ट्र भोई समाज सेनेचे राजेंद्र तमखाने ,भोई समाज बहुउद्देशीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उमेश नंदाने हे उपस्थित राहणार असून मोर्चाला राष्ट्रीय मच्छीमार संघ ,राष्ट्रीय भोई समाज युवा मंच महाराष्ट्र, धुळे जिल्हा भोई समाज महासंघ ,अखिल दाभोळखाडी भोई समाज रत्नागिरी, एकलव्य सेना महाराष्ट्र ,केवट समाज महासंघ महाराष्ट्र , कहार समाज संघ महाराष्ट्र ,बहुजन सेना महाराष्ट्र  या संघटनेचे प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या सभेत समाजा च्या  मागण्या बाबत चर्चा होणार असून क्रांती दलाच्या सर्व प्रदेश पदाधिकारी तथा सहभागी संघटनेचे पदाधिकारी यांनी या सभेला हजर राहण्याचे आवाहन राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे कार्याध्यक्ष अनिल घटमाळ यांनी केले आहे,

Powered by Blogger.