Breaking News
recent

वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण


नांदुरा/प्रतिनिधी

  नांदुरा :- दिनांक 26डिसेंबर 2022 रोजी तालुक्यातील केदार गावात मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे किशोर आत्माराम इंगळे यांनी यांच्या मुलाचा तिसरा वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपोयोगी साहित्य वाटप करून साजरा केला, किशोर आत्माराम इंगळे हे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम ते राबवीत असतात त्यांच्या मुलगा अयांश किशोर   इंगळे यांचा तिसरा वाढदिवस जिल्हा परिषद शाळा केदार येथील सर्व मुलांना शालेय साहित्य वाटप आणि मिठाईवाटप करून साजरा करण्यात आला.

    तसेच विहारांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले व अल्प आहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपस्थितीत, दहिवडी गट ग्रामपंचायत चे ग्रामसेवक गाडेकर,पोलीस पाटील जनार्धन वाटळीकर, सरपंच ज्ञानेश्वर ढोले,किशोर इंगळे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ,रामरातन बाजारे,विनायक पठाडे,हर्षपाल इंगळे, ज्ञानेश्वर पठाडे, सुनील बाजारे, नितीन इंगळे ,संदीप कांडेलकर, संघपाल इंगळे ,मंगेश माहोकार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद जोशी सर यांनी केले,

Powered by Blogger.