तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मिलिंद विद्यालय तालुक्यात सर्व प्रथम
नांंदेड प्रतिनिधी - वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथे नूकतेच संपन्न झाले. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी चे मुख्याध्यापक गायकवाड सर तसेच तालुका क्रीडा संयोजक श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूलचे नंदूजी जाधव यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळेस तालुक्यातील विविध शाळांनी खेळामध्ये सहभाग नोंदवला.
यात फायनल राऊंड मध्ये सगरोळी शाळेची टीम तसेच मिलिंद विद्यालय कुंडलवाडी यांची टीम खेळली. फायनल राऊंड मध्ये मिलिंद विद्यालयाची टीम यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला तालुक्यातून सर्वप्रथम म्हणून खो-खो ची 14 वयोगटातील मुलांची टीम मिलिंद विद्यालय यांनी प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.तर 17 वयोगटाखालील संघाने द्वितीय क्रमांक पटकाविले.
विजेत्या संघाचे सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कुणाल एस.लोहगांवकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एम.एस.खंदारे एच.एन.पांचाळ ,व्ही.एस.देगावकर ,सी.ए. कुंडलवाडीकर शेख सलीम व प्राथमिक शाळेचे संभाजी गायकवाड यांनी अभिनंदन केले.