Breaking News
recent

बुलडाणा जिल्हा आदिवासी कोळी महादेव जमातीला न्याय मिळण्यासाठी २५ जानेवारी आक्रोश बेमुदत लाक्षणिक उपोषण

 



बुलडाणा

    जिल्ह्यातील सर्व  उपविभागीय अधिकारी यांनी वारंवार हेतू पुरस्सर आदिवासी कोळी महादेव जमातीवर सातत्याने अन्याय केलेला आहे याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समस्त बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीचे २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे लाक्षणिक साखळी उपोषण असून मागण्या १)रद्द झालेल्या१९८२ च्या शासन निर्णयाला अनुसरून आदिवासीं कोळी महादेव जमातीचे दाखले देण्यासाठी नकार देतात त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन तथा आर्थिक दंड करण्यात यावे.२)१९८५ च्या शासन निर्णयाला बेरार प्रांतातील कोळी महादेव जमातीसाठी शुद्धिपत्रक  काढण्यात यावे.

    ३)जमातीचे प्रमाणपत्र देत असताना समन्वय साधण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच विधी सल्लागार यांच्या  समक्ष आदिवासी कोळी महादेव अनुसूचित जमातीचे शिष्टमंडळ सोबत चर्चासत्र आयोजित करण्यात यावे.४) उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेल्या मानव वंश शास्त्रज्ञ यांचे  संदर्भ ग्रंथ निजामकालीन, ब्रिटिश कालीन तसेच ऐतिहासिक महसुली पुरावे ग्राह्य धरून कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत या सर्व मागण्यासाठी उपोषणाला सर्व बुलडाणा जिल्ह्यांतील आदिवासी कोळी बांधवांनी उपस्थित रहावे असे बुलडाणा जिल्हा आदिवासी कोळी समाज यांनी प्रसिध्दी पत्रिकेद्वारे कळविले आहे.


Powered by Blogger.