विदर्भ-कोकण जोडणाऱ्या ०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला शेगांव थांबा ४ जानेवारीपासून मंजुर
राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस वैभव बहुतूले यांच्या प्रयत्नाना यश:कोकणातून येणाऱ्या शेगांवला जाणाऱ्या गजानन महाराज भक्तांची मागणी पुर्ण विदर्भ कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ०११३९/०११४०नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून थांबा देण्यात आला आहे कोकणातून शेगांवला जाणार्या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पुर्ण झाली आहे
विदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे गजानन महाराज संस्थान कडुन देण्यात येणार्या सोयी-सुविधा,शिस्त,पारदर्शी कारभार यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी राहते.राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून भाविक शेगांवला येतात.त्यात विदर्भ कोकण जोडणाऱ्या नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे असे प्रवासी संघटना शेगांव शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती शेगांव ॲड पुरुषोत्तम डांगरा, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष श्री राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा शबनम शेख,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री वैभव बहुतूले ,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगावकर,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत सांगितले आहे