राष्ट्रीय स्पर्धेत गायत्री मैंद हिला रजत पदक
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली : गुलमर्ग,जम्मू आणि काश्मीर येथे दि. ३ जाने. ते ८जाने. २०२३ दरम्यान द्वितीय सब ज्युनिअर /ज्युनिअर अँड सिनिअर कर्लिंग नॅशनल चैनपेनशिप २०२२-२०२३ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा इंटरनॅशनल ऑलिम्पिक, खेलो इंडिया व इंडियन ऑलिम्पिक यांच्या अधिपत्याखाली व कर्लिंग फेडेरेशन ऑफ इंडिया व जम्मू आणि काश्मीर कर्लिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत चिखली येथील गायत्री मैंद हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत सिनिअर मिक्स टीम मध्ये सहभागी होऊन गायत्री मैंद हिने रजत पदक प्राप्त केले. सदर स्पर्धेत एकूण ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्तराखंड च्या संघाला स्वर्ण पदक, महाराष्ट्र संघाला रजत तर जम्मू आणि काश्मीर संघाला कांस्य पदक प्राप्त झाले आहे.
गायत्री मैंद हिच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत तीच कौतुक व अभिनंदन होत आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती आई वडील, प्रशिक्षक व महाराष्ट्र कर्लिंग संघटनेचे सचिव शेख साबीर पुणे, यांना देते. तिच्या या यशाबद्दल चिखली पत्रकार संघांचे अध्यक्ष योगेश शर्मा, तलवारबाजी प्रशिक्षक अक्षय गोलांडे, Adv दिलीप यंगड, गोदरी गावचे सरपंच भरत जोगदंडे, प्रा शरद इंगळे यांनी प्रत्यक्ष भेटून तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.