चिखली तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत
चिखली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश शर्मा,सचिवपदी तौफिक अहेमद,तर कोषाध्यक्षपदी छोटू कांबळे
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली : चिखली तालुका पत्रकार संघाची आज रोजी स्थानिक शासकिय विश्राम गृह येथे महत्वपूर्ण बैठक मावळते सचिव रवींद्र फोलाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कार्यकारणी सर्वानुते घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी योगेश शर्मा , उपाध्यक्षपदी कमलाकर खेडेकर, सचिव तौफिक अहेमद , कोषाध्यक्षपदी छोटू कांबळे , सहसचिवपदी इम्रान शहा, संघटकपदी नितीन फुलझाडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ सदस्य मनोहर गायकवाड,संतोष लोखंडे , कैलास शर्मा, नितिन गुंजाळकर, कैलास गाडेकर, रमाकांत कपूर, यांनी मार्गदर्शन करुन नविन कार्यकरणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य
संतोष लोखंडे ,कैलास शर्मा,नितिन गुंजाळकर ,रेणूकादास मुळे,कैलास गाडेकर,इफ्तेखार खान,गणेश सोळंकी,रमाकांत कपूर,रवींद्र फोलाने,भिकू लोळगे सत्य कुटे,राजु सुरडकर,महेश गोंधणे,भरत जोगदंडे, संजय खेडेकर,साबीर शेख,रमिज राजा,सैय्यद साहिल उपस्थित होते.