बुलडाणा अर्बन च्या कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष रुपयांचा अपहार
पदाचा गैरवापर करून व्यवस्थापक व दोन्ही लिपिकांनी केले स्वता खर्च
मोताळा :- आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या तालुक्यातील कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष 59 हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी सचिन झंवर वय 40 वर्ष यांच्या फिर्यादीवरून तिघा विरुद्ध विविध कलमा अनुसार गुन्हा सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी विविध गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या घटने मुळे संपुर्ण मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत सचिन घनराजजी झंवर वय 40 वर्ष राहणार शास्त्री नगर मलकापूर यांनी बोराखेडी पोलिसांना दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. की दिनांक 21 जुन 2021 पासून ते जुलै 2022 दरम्यान बुलडाणा अर्बन को ऑ केडीट सो. मार्या. बुलडाणा संस्थेच्या कोथळी शाखेतील व्यवस्थापक सुनिल मोहनलाल गांधी, लिपिक सतिष घनश्यामदास राठी व मधुकर दगळू सावळे यांनी आपले पदाचा गैरवापर करून संगणमताने कोथळी येथील वरील नमुद शाखे मधील ठेवीदारांचे मुदत ठेवीचे पैसे हे ठेवीदारांनी मुदत ठेव ठेवल्यानंतर बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी कोथळी मध्ये जमा न करता खातेदारांच्या सेवीग पास बुकवर बनावट/ हस्तलिखीत नोंदी करून ते शाखेत जमा झाल्याचे खातेदारांना भासवून ते पैसे स्वतासाठी वापरले. तसेच खातेदारांचे सेवीग खात्यांवरील पैसे त्यांच्या मुदत ठेव खात्यांवर वळते न करता शाखेतील इतर खात्यांवर वळते करून तेथून विड्राल केलेत. असा एकुण 1,37,59,500/- रुपयांचा अपहार वरील नमुद तिघांनी करून सदरचे पैसे स्वताचे फायदयासाठी वापरलेले आहेत.
अश्या सचिन झंवर वय 40 वर्ष राहणार शास्त्री नगर मलकापूर यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी सुनील मोहनलाल गांधी वय 42 राहणार नांदुरा,सतिष घनशामदास राठी वय 40 राहणार मोताळा, मधुकर दगडु साळवे वय 52 राहणार मोताळा यांच्या विरुद्ध अप क्रमांक 63/2023 च्या कलम 409, 420, 465, 468, 471, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय विकास पाटील करीत आहे.