ग्रामपंचायत मलवडी येथे आद्य क्रांतिवीर थोर स्वातंत्र्य सैनिक राजे उमाजी नाईक यांच्या 191 व्या पुण्यतिथी निमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
प्रतिनिधी: शकील
मलवडी तालुका फलटण येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायत मलवडी येथे अभिवादनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा वेळी नवनाथ नरुटे यांनी राजे उमाजी नाईक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जो खूप मोठा संघर्ष केला याविषयी माहिती दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी राजे उमाजी नाईक इंग्रजी सत्तेला पळो की सळो करून सोडणारे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांना आज 3 फेब्रुवारी 1832 रोजी न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीच्या शिक्षेचा आदेश दिला. आणि खडक माळ येथील मामलेदार कचेरी येथील एका विहिरी जवळ त्यांना फाशी देण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नरवीराला भारत सरकारने सर्वोच्च पदवीने सन्मानित करावे. आजच्या दिनी हीच अपेक्षा हेच खरे अभिवादन.
या वेळी मलवडी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री बाजीराव तरडे, श्री शकील सय्यद ,श्री कोंडीबा रुपनवर, पै दीपक कारंडे, ग्रामसेविका सौ पाटोळे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री सुरेश कारंडे, श्री आप्पा रिटे समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत मलवडी उपस्थित होते