मलकापूरमधील हॉटेल मदिनामधून गोमांस जप्त
एकाला अटक पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ
मलकापूर येथील वली चौकातील हॉटेल मदिनामधून पोलिसांनी २० किलो गोमांस जप्त केल्याने शहरात खडबड उडाली आज २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. शहरातील वली चौकातील हॉटेल मदिना येथे गोमांस असल्याची पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली. या माहितीचा आधारे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक ईश्वर सोळंके यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने हॉटेल मदिनावर दुपारी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी २० किलो गोमांस जप्त केली. तसेच या प्रकरणी मोहनपुरा येथील जुनेद एमद महमद शफी याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी पोलिसांनी कलम ४२९. ५ (ड) ९ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील विविध संघटनांनी वेळोवेळी गोहत्या होत असल्याने वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतु, प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याची भूमिका घेतली जात नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आज हॉटेल मदिना येथे कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान, जप्त केलेल्या गोमांसांचे नमुने अमरावती येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे गोमांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, उपनिरीक्षक बालाजी सानप, ईश्वर वाघ, संतोष कुमावत, राठोड यांनी केली.