बोगस दिव्यांगधारकांवर तात्काळ कारवाई करा - प्रशांत पाटील
दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सवलती घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र फेरतपासणीचे आदेश बुलडाणा जि.प.समोर दिव्यांगावर कारवाई साठी धरणे आंदोलनात रयत सहभागी
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली - बोगस दिव्यांगा विरोधी वाढत्या तक्रारीवरून दि. २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाचे कार्यासन आधिकारी ह.सु. पाठक यांनी सर्व जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी यांना पत्र काढून राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील अपंग प्रमाणपत्राच्या आधारे सवलती घेणाऱ्या अपंग शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले असून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या समोर अन्यायग्रस्त शिक्षकांनी दि २२ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन केले त्यात रयत क्रांती पक्षाने सहभाग नोंदवून पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी बोगस दिव्यांग धारकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दोन वर्षांपूर्वी तारांकित प्रश्न उपस्थित केला असता विधानपरिषदेचे सभापती यांनी बुलढाणा जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती मागवली असता बुलढाणा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दाखवून अप्रत्यक्षरित्या बोगस दिव्यांग धारकांना अभय दिले होते आज वर प्रत्येक अधिकाऱ्यांनी या बोगस दिव्यांग धारकांना पाठीशी घालण्याचेच काम केलेले आहे, त्यामुळे दिव्यांग नसलेले व खरे दिव्यांग असलेल्या शिक्षकांवर जिल्ह्यात कायम अन्यायच होत आहे,आजवर या बोगस दिव्यांग धारकांवर कुठलीच कारवाई किंवा त्यांची साधी चौकशी देखील झालेली नसल्याने बहुतांश इतर शिक्षकांनी देखील दिव्यांग प्रमाणपत्र काढले असून कुणावर ही कारवाई होत नसल्याने इतरत्र बदली होऊ नये म्हणून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून लाभ घेण्याचे प्रकार खूपच वाढलेले आहेत,प्रशासनाने चौकशी करून कुठलीही कारवाई करू नये म्हणून बोगस दिव्यांगांचे नेते प्रत्येक बोगस दिव्यांग शिक्षकांकडून प्रत्येकी १५००० वेळोवेळी न्यायालयीन प्रक्रियेच कारण दाखवून वसूल करत आहेत त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेणारे देखील तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात असल्याचे दिसत आहे,त्यामुळे खरे दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याने त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारलेले होते.
इतर शिक्षक संघटनांसह रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी देखील सहभाग नोंदवला होता परंतु जिल्हा प्रशासनाने वेळीच या बोगस दिव्यांगावर बीड जिल्हा परिषदेच्या धर्तीवर तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते ढोरे पाटील यांनी दिला आहे,यावेळी शिक्षक देविदास बडगे,सुनिल धंदर, शिवानंद मांटे, गजानन बाहेकर,अशोक राजनकर,देशमुख, रोठे,जवरे,ताठे, बाहेकर,पाटील,गवई,अवचार , वैराळकर,बडोकार,कांचन प्रधान ,संध्या भटकर यांच्यासह बहुसंख्य अन्यायग्रस्त शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी होते व तात्काळ बीड जिल्हा परिषदेच्या धर्तीवर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी लावून धरलेली होती