निलेश बाळु चोपडे राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत
दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी निस्वार्थ भावनेने मलकापूर तालुक्यातील कार्यरत असलेले दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपड़े यांच्या कार्याचा गौरव करीत राष्ट्रभक्ती जनविकास संघटना, भारतच्या वतीने राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला.गेल्या अनेक वर्षापासून मलकापूर तालूक्यात दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे दिव्यांगांसाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.
भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांना राष्ट्रभक्ती जनविकास संघटना, भारतच्या वतीने राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊ सन्मानित करण्यात आले आहे.त्यावेळी उपस्थित चावडी उद्योग समूहाचे मा.श्री.अमीत मखरे सर,समर्थ जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.जगन्नाथ माने सर,राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेचे मा.श्री.सुनील गोरे सर,मा.श्री.विनीत सिंधुताई सपकाळ,मराठी सिनेमा निर्माते आनंद पिंपाळकर, व दिव्यांग फाउंडेशन चे सचिव शेख रईस शेख रशीद, इत्यादी उपस्थित होते...