खुनाच्या गुन्हयातील आरोपी 48 तासामध्ये श्रीगोंदा पोलीसांन कडुन जेलबंद
फिर्यादी नामे श्री श्रीरंग दशरथ शिर्के रा शिरसगांव बोडखा ता श्रीगोंदा जिल्हा अहमगनगर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दिनाक 04/3/2023 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन फिर्याद दिली त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे रामा राजु बरकडे 2) बिट्या राजु बरकडे दोन्ही रा बाबुर्डी ता श्रीगोंदा यांच्या विरुध्द जमीनच्या वादातुन खुन केल्या बाबत फिर्याद दिली होती. त्या बाबत श्रीगोदं पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रंमाक 271/2023 भादवि कलम 302.34 प्रमाणे दिनाक 4/03/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान तांत्रीक तपासाच्या मदतीने व गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने मिळाल्या माहिती अन्वये सदर गुन्हा अनैतिक संबंधाचे कारणातुन इसम नामे 1) अमोल आप्पा कुरुमकर वय 28 वर्षे 2) अक्षय नानासाहेब वाघस्कर वय 23 वर्षे दोघे रा वडाळी ता श्रीगोंदा जिल्हा अहमनदगर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आज दिनाक 06/03/2023 रोजी त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी अनैतिक संबंधातुन संगनमताने मयत नामे दशरथ साहेबराव शिर्के वय 65 वर्षे रा शिरसगांव बोडखा ता श्रीगोंदा यांचा खुन केल्याची कबुली दिली आहे.
नमुद कारवाई मा. राकेश ओला, मा. पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर, व मा आण्णासाहेब जाधव उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांच्या मार्गदर्शणा खालील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले पोसई समीर अभंग, सफौ ढवळे, सफौ विट्टल बडे, पोना गणेश गाडे इंगवले, पोकॉ अमोल कोतकर, रविंद्र जाधव, प्रताप देवकाते, गणेश साने श्रीगोंदा पोलीस स्टेशन तसेच पोका प्रशांत राठोड मोबाईल सेल अहमदनगर यांनी केली आहे.