म. फुले, डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव आढावा बैठक संपन्न
मलकापूर: (२६) येथील प्रेमराज फिटनेस क्लब मधे २०२३ चा म . फुले - आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव उत्साहात व शिस्तबध्द पद्धतीने संपन्न करण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठक अशांतभाई वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी "समतेचे निळे वादळ" सामाजिक संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष ॲड.कुणालभाई वानखेडे यांच्या नेतृत्वात संयुक्त जयंती उत्सव समिती गठीत करणे,या वर्षीचे समाजभूषण पदावर सुयोग्य व्यक्तीची निवड करणे, दरवर्षी प्रमाणे दि.११ एप्रिल रोजी सकाळी ९-३० वाजता म.ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त जोतिबांच्या जीवनावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन भीमनगर येथील त्रिरत्न बुध्द विहारा समोरील प्रांगणात करणे, दि १४ एप्रिल सकाळी ७ महामानव क्रांतीसुर्य म.फुले व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन ७-१५ वाजता धम्म वंदना ७-३० वाजता सालाबादप्रमाणे भीमनगर येथून मोटार सायकल रॅली परंपरागत मार्गाने शहरातील प्रमुख मार्गावरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करणे दुपारी ५ वाजता
नेहमप्रमाणे नियोजित मार्गाने महा पुरुषांच्या तैल चित्रांची भव्य मिरवणुक काढणे, रात्री सार्वजनिक वाचनालयाच्या भव्य पटांगणावर फुले - आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करणे, नामवंत कलाकाराचा प्रबोधनपर कार्यक्रम घेणे , सर्व कार्यक्रमांचे प्रमुख निवडणे आदी बाबतीत ठराव घेण्यात आले. या बैठकिस सर्वश्री समाजभूषण श्रीरंग तायडे, सुरेश इंगळे, हरिभाऊ इंगळे, आत्माराम इंगळे (समाजभूषण),अशोक जाधव, राजेंद्र पवार,दिलीप इंगळे, मोहन खराटे, डॉ योगेश सरदार, कुणाल सुधिरराव सावळे, उल्हास शेगोकार,सतीश दांडगे, मिलिंद शिंदे,संजय धुरंधर,प्रशिक झनके, दिपक मोरे, कडू तायडे,रवी भारसागले , संतोष इंगळे,दिपक रणीत,सिद्धार्थ दांडगे,रवी बाभुळकर, ॲड.सुबोध इंगळे,प्रकाश तायडे,शिवाजी बिऱ्हाडे, प्रभाकर इंगळे,मजीद सरकार , इमरान शेख,राजू शिरसाट,प्रशांत तायडे,अमोल बिऱ्हाडे, डी एस हेलोडे,एन. के. हिवराळे,भारत सुरडकर,संदीप वानखेडे, डॉ.ढाले,शरद झनके,जी. डी. झनके, रमेश इंगळे,राजू जाधव, संतोष इंगळे,प्रकाश दिनकर इंगळे व असंख्य भीमसैनिक कार्यकरते हजर होते. प्रास्ताविक "समतेचे निळे वादळ" मलकापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी तर आभाप्रदर्शन शहर अध्यक्ष मोहन खराटे यांनी केले.