बिबट्यासह अन्य हिंस्रपशूंचा तात्काळ बंदोबस्त करा - अनमोल ढोरे पाटील
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली - तालुक्यातील करतवाडी शेतशिवारात रात्रपाळीला शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शरद तायडे नामक शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली दि.२ मार्च च्या रात्री घडली असल्याने परिसरात असलेल्या बिबट्यासह अन्य हिंस्र पशूंचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील यांनी केली आहे.
पेनटाकळी प्रकल्पातील पाणीसाठा नदीपात्रात दूरपर्यंत असल्याने वरखेड,घनमोडी, मानमोडी, करतवाडी सह देवदरी शिवारातील पांढरदेव ,भोरसा भोरसी परिसरात बिबट्यासह अस्वल,रानडुक्करांचा संचार वाढला असल्याचे वारंवार निदर्शनास येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रारी करून देखील अध्यापर्यंत कुठल्याही ठोस उपाययोजना संबंधीत विभागाकडून झालेल्या नसल्याने परिसरातील शेतकरी बांधव जीव मुठीत घेऊन शेतात काम करत आहेत परंतु लाईन अभावी शेतकऱ्यांना रात्रपाळीला शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेल्याशिवाय गत्यनंतर नसल्याने परिसरात पाण्याच्या भटकंतीने आलेल्या हिंस्र पशूंचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला असल्याने तात्काळ वनविभागाने बिबट्यासह अन्य हिंस्र पशूंचा तात्काळ बंदोबस्त करावा असे भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.