नांदुरा अर्बन बँकेत सभासदांची गैरवर्तणूक
नांदुरा /प्रतिनिधी
नांदुरा अर्बन बँक भ्रष्टाचाराची चौकशी फिरते पथकाकडून चालू असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे, नांदुरा अर्बन बँकेत सभासदांना मागितलेली माहिती करिता लेखी अर्ज घेऊन जर बँकेत गेले तर आवक जावक चा कर्मचारी आधी आपला अर्ज घेतो व मॅनेजर खंडेलवाल यांना किंवा सरव्यवस्थापक राजेंद्र पांडे यांना दाखविल्यावर त्यांनी कर्जाची पोच घ्यायची की नाही हे ठरवल्यानंतर अर्ज घेतला किंवा परत केला जातो, म्हणजे सभासदांचा अर्ज देखील लोकशाही पद्धतीने घेत नाही, सध्या तर सर्व सामान्य सभासद जर अर्ज मागणी अर्ज मागण्याकरिता केला तर त्याला अर्ज तर देतच नाही, पण अनेक प्रश्न विचारून नंतर एक कागद दिला जातो, त्यावर कोरे चेक ही सोबत मागण्यात येतात,
कर्जअधीक्षक राठी असलेले कर्मचारी सभासदांची नीट बोलत नाही, व माहिती देत नाही मॅनेजर राधेश्याम खंडेलवाल यांची नियुक्ती पासून आतापर्यंत नांदुरा शाखेतच आधी कर्ज अधीक्षक व आता मॅनेजर म्हणून ठाण मांडून बसल्यामुळे त्यांची वागणूक उद्धटपणाची हुकूमशाहीची पद्धतीची आहे, काही दिवसापूर्वी एका गोल्ड लोन भरण्याचा कर्जदार कडून खंडेलवालने कर्ज भरून घेतले, परंतु नंतर त्या व्यक्तीला त्याचे सोने परत करता येत नाही, असे सांगितले असता त्यांनी का देत नाही, म्हणून जॉब विचारला तुम्ही एका कर्ज धारकास जमानत घेतलेली आहे, त्यामुळे लोन कर्ज भरल्यानंतर आपले सोने परत देऊ असे बेकायदेशीरपणे उत्तर दिले, नंतर त्या व्यक्तीने एका संचालकाशी संपर्क केल्यानंतर व त्या संचालकाने देखील त्या मॅनेजर खंडेलवाल यांना विनंती करून सोने परत संबंधितशी दिले, एवढी मोठी या खंडेलवालची हुकूमशाही या शाखेत चालू आहे, खंडेलवाल कोणात्या पाठबळाने इतके वर्ष या शाखेत आहे व यांच्यावर अध्यक्ष किंवा संचालक मंडळ कारवाई का करत नाही ?
असा प्रश्न सभासद पासून तर प्रमाणित कर्मचाऱ्यांना देखील पडला आहे, सामान्य सभासद यांना कर्ज मागणी अर्जापासून तर इतरही काही कामात अनेक अडचणी येतात एवढे मात्र खरे, सभासद यांच्या भरोशावर एवढी मोठी बँक झाली आहे, पण या कर्मचाऱ्यांच्या मग्रूर पणामुळे बँक पणाला लागली आहे, असे सभासदांमध्ये बोलले जात आहे,