Breaking News
recent

भरधाव कंटेनरने पादचाऱ्याला चिरडले


मलकापूर

    भरधाव कंटेनर ने पादचाऱ्याला धडक देऊन जागीच ठार केल्याची घटना दिनांक ७ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हायवे क्रमांक ६ वर कोल्हे पेट्रोल पंप नजीक घडली. यावरून कंटेनर चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, देवानंद निनाजी तायडे वय ३२ वर्ष रा. वाघूळ असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पो स्टे ला दिलेल्या फिर्यादी नुसार सदर व्यक्ती हायवे क्रमांक सहावर कोल्हे पेट्रोल पंप नजीक रस्ता ओलांडत असतांना नांदुरा दिशेने येणाऱ्या वाहक क्रमांक आर. जे. ०७ जी.डी. १६८९ या भरधाव कंटेनरने निष्काळजीपणाने वाहन चालवत पायी जात असलेल्या व्यक्तीला समोरून धडक देऊन दूर पर्यंत फरपटत नेले. यात पादचाऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतची

फिर्याद संदेश तायडे यांनी 'मलकापूर शहर पोलीस स्टेशन दिली यावरून अपघातास कारणीभूत असलेल्या कंटेनर चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलीस करत आहे.

Powered by Blogger.