मानसी अर्बन निधी लि. बँक शाखेचे लोणी येथे उदघाटन.
देगलूर प्रतिनिधी :- बालाजी एकबेकर
देगलूर तालुक्यातील मौजे लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्याजक नारायण शिंदे (पाटील)यांनी जनतेच्या सेवेसाठी लोणी येथे मानसी अर्बन निधी लि. बँक शाखेचे या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष (भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष) व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना म्हणाले कि लोणी गावातील परिसरातील शेतकरी, कष्टकरी मजूर लोकांना यांचा फायदा झाला पाहिजे.
आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा समाजातील प्रत्येक नागरिकांचे उत्त्पन्न कसे वाढेल, त्याचे जीवनमान कसे उचावेल त्याची प्रगती कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.रोजगारनिर्मितीकरिता व्यवसाय सुरु करून रोजगार दिले पाहिजे लोणी परिसरातील जनतेनी मानसी अर्बन निधी लि. बँकशी जुळल्या आहेत उद्योजगाच्या माध्यमातून यशस्वी भरारी घेत आहे असे प्रतिपादन गोजेगावकर साहेबांनी केले आहे.यावेळी परिसरातील अनेक महिला पुरुष तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.