Breaking News
recent

हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या विषयी इन्स्टाग्रामवर वर विकृत लिखाण करणार्‍यांविरूध्द कठोर कारवाई करावी - राजपूत समाज बांधव

 



 मलकापूर

इन्स्टाग्रामवर हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांचेबद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दात लिखान करणार्‍यांविरूध्द कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी सकल राजपूत समाज मलकापूरच्या वतीने आज ३१ मार्च रोजी पोलीस निरीक्षक मलकापूर शहर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २८ मार्च रोजी अज्ञात इसमाने इंस्ट्राग्रामवर फेक अकाऊंट नावाने महाराणा प्रताप ११ यु इंस्ट्रा प्रो नावाने ओपन केले व त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावून त्यामागे अशोक चक्र लावलेले असून सदर अकाऊंटमध्ये हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंहजी यांचे विरूध्द अत्यंत घाणेरड्या शब्दात मजकूर लिहून इंस्ट्राग्रामचे अकाऊंट सुरू केले. त्यामध्ये देवनागरी भाषेत लिहून हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची बदनामी कारक विधाने नमूद केली आहे. सदर व्यक्तीने समाज विघातक कृत्य करून राजपूत समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच समाजाची जनमाणसात व सर्वसामान्यांमध्ये प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

तेव्हा असे कृत्य करणार्‍या अज्ञात व्यक्तीचा शोध घेवून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी संदीपसिंह राजपूत, दिनेशसिंह गौर, पवनसिंह गौर, विजयसिंह गौर, नरेशसिंह भदोरीया, जयपालसिंह राजपूत, बजरंगसिंह राजपूत, पी.डी.राजपूत, जसवंतसिंह राज्पूत, बी.के.गौर, रामसिंह राजपूत, चंदनसिंह राजपूत, कुलवंतसिंह राजपूत, अनिल हिंगे, डी.व्ही.ठाकूर, अतुलसिंह राजपूत, विरसिंह राजपूत, हरपालसिंह राजपूत, करण राजपूत आदी समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Powered by Blogger.