Breaking News
recent

म. फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली, मिरवणूक, जाहीरसभा व सारेगमफेम आकांक्षा नगरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम !

 


मलकापूर दरवर्षी प्रमाणे यंदाही म. फुले- आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव 'समतेचे निळे वादळ' या सामाजिक संघटना व भिमयुवक शैक्षणिक व बहुउद्देशीय मंडळ मलकापूरच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या वर्षी सुप्रसिध्द गायिका सारेगमफेम आकांक्षा नगरकर यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरणार आहे. ११ एप्रिल रोजी म. ज्योतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्त त्रीरत्न बुध्दविहार भिमनगर येथे सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला असून समाजभूषण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व 'समतेचे निळे वादळ' या सामाजिक संघटनेचे संस्थापक भाई अशांत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.


    १४ एप्रिल रोज गुरुवारला म. फुले आंबेडकर संयुक्त जयंती १३२ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त भिमनगर त्रीरत्न बुध्द विहाराचे प्रांगणात सकाळी ७ वाजता दरवर्षी प्रमाणे महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण समाजभूषण अरुण इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण अशांतभाई वानखेडे, धम्मवंदना आर. एम. सुर्यवंशी, धम्मदास वानखेडे व ७.३० वाजता युवा जिल्हाध्यक्ष कुणालभाई वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना, प्रतिमांना शिवाजी नगर येथील छ. श्री शिवाजी महाराज, रेल्वे क्वार्टर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तहसील चौकातील क्रांतीकारक सुभाषचंद्र बोस, बुलडाणा रोडवरील संत गाडगे महाराज, बसस्थानकातील महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करीत सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी करण्यात आले आहे.

     तर सायंकाळी ५ वाजता म. फुले-आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक भिमनगर येथून मोहन खराटे, दिलीप इंगळे यांच्या देखरेखीत प्रारंभ करून सार्वजनिक वाचनालयाचे भव्य पटांगणावर सभेत रुपांतर होऊन ८ वाजता महामानवांना विनम्र अभिवादन करण्यात येणार असून यावेळीखा.रक्षाताई खडसे, आ. राजेश एकडे, माजी आमदार वसंतराव शिंदे, दामोधर लखानी, राकाँ जिल्हाध्यक्ष संतोषराव रायपुरे, शहराध्यक्ष अरूण अग्रवाल, अनिलदादा झोपे, माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख, विजयराव जाधव, श्यामकुमार राठी, अॅड. हरीश रावळ, हाजी रशिदखाँ जमादार, भाराकाँ नेते डॉ. अरविंद कोलते, राजेंद्र वाडेकर ,नारायणदास  निहलानी, रमेशसिंह राजपूत, राजू पाटील, बंडू चौधरी डॉ. जी. ओ. जाधव, शिवसेना शिंदे गटाचे नेते, शिवसेना (उबाठा) गटाचे नेते, शेतकरी संघटनेचे नेते तसेच सर्वपक्षीय मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आदींना यावेळी निमंत्रित केल्याचे दिलीप इंगळे यांनी कळविले आहे. या मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. तर सायंकाळी ८.३० ते १२ वा. पर्यंत सुप्रसिध्द टीव्ही स्टार आकांक्षा नगरकर, युवारत्न पुरस्कार प्राप्त राहुल तायडे अमरावती, सुप्रसिध्द निवेदीका प्रतिक्षा डांगे आदींच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

    वरील सर्व कार्यक्रमांना जनतेने व सर्व पक्षीय नेते मंडळीनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन म. फुले- आंबेडकर संयुक्त जयंती समितीच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष कुणालभाई वानखेडे, धम्मदास वानखेडे, दिलीप इंगळे, मोहन खराटे, राजेंद्र पवार, अनिल पैठणे, भारत महाले, बाळू उमाळे, दिपक मेश्राम, अनिल अवसरमोल, गणेश टाक, सुभाष झनके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Powered by Blogger.