निमगाव येथील शंकरपटात एकवंड तांडा येथील बैलजोडी प्रथम करोड येथील बैलजोडीला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस
निमगाव नांदुरा येथून जवळच असलेल्या निमगाव येथे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान निमगावच्या वतीने १७ व १८ एप्रिल रोजी निमगाव फाट्यावर शंकरपट पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. राजेश एकडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद कोलते, हरीश रावळ, वसंतराव भोजने, लाला इंगळे, अजय धनोकार, पदमराव पाटील, मोहन पाटील, भगवान धांडे, विजयसिंह राजपूत, पांडुरंग इंगळे, मधुकर चरखे, महादेव राऊत, विष्णू इंगळे उपस्थित होते. यामध्ये जनरल गट प्रथम बक्षीस ५१ हजार रुपये आमदार राजेश एकडे यांच्याकडून एकवंड तांडा येथील जोडी मालक बाबासाहेब चव्हाण यांना देण्यात आले. दुसरे बक्षीस ३५ हजार नीलेश पाऊलझगडे यांच्याकडून मनोहर चव्हाण करोडी यांना देण्यात आले.
गावगाडा गटामध्ये प्रथम बक्षीस २१ हजार संजय इटखेडे, योगेश चावरे यांच्याकडून चैतन्य चव्हाण आडगाव यांना तर दुसरे बक्षीस १५ हजार मनोहर कवडकर, मनोहर दळवी यांच्याकडून बंडू पाटील अकोली यांनी पटकावले. तसेच इतर पारितोषिक २ लाख ५१ हजारपर्यंत होते. बक्षिसांचे वितरण प्रणव एकडे यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.रामदास दळवी, भगवान धोटे, नीलेश पाऊलझगडे, मनोहर दळवी, ज्ञानेश्वर देशमुख, राजू बाप्पू देशमुख, संतोष देशमुख, राम देशमुख, देवराव दाभाडे, संतोष इंगळे, अमोल नसुर्डे, उल्हास काकड, अनिल धोटे, संतोष दळवी, विपुल देशमुख, मोहन देठे, वैभव देशमुख, लक्ष्मण म्हसाळ, महेश पिसे, पांडुरंग वानखडे, अमोल सोनवणे तसेच गावातील सर्व नागरिक, तरुणांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.